विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संघ प्रचारक म्हणून किंवा संघाशी निगडीत राहून सुमारे 15 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाचा पहिला अनुभव घेतला. त्यानंतर 15 वर्षे राजकीय कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये राहिले राजकीय संघटनेशी संबंधित गोष्टींचा अनुभव घेतला. त्यानंतर 15 वर्षे मुख्यमंत्री होते. ही सगळी 45 वर्षे एकत्र जोडल्यास अनुभवाचे मोठे संचित तयार होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी अद्वितिय नेते झाले आहेत,असे कौतुक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे.According to Prashant Kishor, 45 years of experience of Sangh Pracharak, Bjp activist and Chief Minister, that is why Prime Minister Narendra Modi is unique.
एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखीत प्रशांत किशोर बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. एवढ्या मोठ्या पदावर कोणीही पोहोचला तर त्याच्यात अनेक गुण असतात. एका शब्दात किंवा वाक्यात त्याचा सारांश सांगणे फार कठीण आहे, पण ते एक उत्तम श्रोता आहेत. त्यांना माहिती आहे की सामान्य लोक काय विचार करतात. 40-50 वर्षांचा अनुभव असल्यामुळे ते हे करू शकतात. त्या अनुभवाच्या आधारे, लोकांना काय ऐकायचे आहे हे समजून घेण्यात ते तुमच्या आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत.
प्रशांत किशोर म्हणाले, माझ्या उत्तर: नवीन भूमिकेबद्दल माझी 100% स्पष्टता नाही. माझ्या मनात काहीतरी आहे. कल्पनाही आहेत की, हे करता येईल, ते करता येईल. पण मी अजून ते पूर्णपणे ठरवलेले नाही. मी राजकीय क्षेत्रात राहणे बºयाच प्रमाणात शक्य आहे. कदाचित मी राजकारणात जाईन. कदाचित नाही. आतापर्यंत मी काहीही ठरवले नाही. मी गेल्या वर्षी 2 मे रोजी ही घोषणा केली होती. त्यामुळे या वर्षी 2 मेपर्यंत काहीतरी निर्णय घ्यावा, असा विचार आहे.
प्रशांत किशोर गुजरातसह विविध राज्यांतील निवडणुकांबाबत म्हणाले, विरोधक एकसंध असतानाही खूप कमकुवत असू शकतात. असे अनेक संदर्भ आहेत जिथे विरोधक एकत्र नसले तरी खूप मजबूत असू शकतात, तर या दोन गोष्टी सारख्या नाहीत. प्रथमत: सर्व एकत्र येणेच खूप कठीण आहे, कारण पक्षांचे आपसांत स्पर्धात्मक हितसंबंध आहेत. सगळे एकत्र येतील, हे शक्य नाही. युनायटेड आॅपॉझिशनबद्दल बोलणारे बहुतेक लोक तुम्ही पाहिले असतील, त्यांना वाटते की भाऊ माझ्या राज्यात सोडून बाकी पूर्ण देशात एकजूट व्हावे.
समजा तुम्ही सपा असाल, तर तुम्हाला यूपीमध्ये स्वत:च लढायला आवडेल. तुम्ही राष्ट्रीय जनता दल असाल तर े बिहारमध्ये लढावे असे त्यांना वाटते. तिथे ते विरोधी ऐक्याबद्दल तितक्या जोमाने बोलत नाहीत. विरोधी ऐक्यामध्ये ही अडचण आहे. मी याच्या बाजूने नाही. माझी समजूत अशी आहे की अनेक राज्यांमध्ये एकसंध विरोध हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु प्रत्येक राज्यात ते जरूरी नाही. ही जी महाआघाडीची संकल्पना आहे, त्याची सुरुवात 2015 मध्ये बिहारमधून झाली होती. तेव्हापासून सर्व विरोधक एकत्र आले तर निवडणुका जिंकल्या जातील,
असा समज लोकांमध्ये निर्माण झाला होता, परंतु 2015 नंतर असे सर्व प्रयत्न धुळीस मिळाले. निवडणुकीत कोणीही जिंकलेले नाही. याचे कारण केवळ पक्ष किंवा नेते एकत्र आल्याने त्यांचे संपूर्ण मतदारही एकत्र येतील, हे जरूरी नाही. पक्षांसोबत एकत्र येण्याबरोबरच तुम्हाला एक नॅरेटिव्ही पाहिजे, चेहराही पाहिजे, ग्राउंडवर कोआॅर्डिनेशनही पाहिजे, तुमचा प्रचारही प्रभावी व्हायला हवा. केवळ पक्ष आणि नेत्यांना भेटून तुम्ही मजबूत विरोधकाची कल्पना करू शकत नाहीत.
उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत प्रशांत किशोर म्हणाले, एवढ्या मोठ्या देशात जवळजवळ 60 कोटी लोक असे आहेत, जे दिवसाचे 100 रुपयेही कमावत नाहीत. त्या देशात मुद्दे नसतील, सरकारकडून अपेक्षा नसतील, असे शक्यच नाही. गरज या गोष्टींची आहे की, तुम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की, लोकांची खरी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर आहे आणि ती समजून एका सिस्टमॅटिक पद्धतीने उचलावी. तेव्हाच लोकं तुमच्याशी जोडले जातील. बहुतांश लोक महागाईला एक मुद्दा मानतात, पण यानंतरही मतदान या प्रकारे का होत आहे,
लोक सरकारच्या विरुद्ध मतदान का करत नाहीत. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, लोकशाहीत पॉलिटिकल पार्टी आणि लीडर्सची एक भूमिका आहे. जर समाज या मुद्द्यांना उचलण्यात स्वत: सक्षम असता, तर मग लीडर्स आणि पॉलिटिकल पार्टीजची गरजच काय होती? त्यांची गरजच यासाठी आहे की, जेणेकरून मुद्दे प्रामाणिक पद्धतीने मांडले जावेत. जर तुम्ही ते मांडले तर फायदा होईल, नाहीतर नुकसान होईल.
प्रशांत किशोर म्हणाले,उत्तर प्रदेशात 2012 मध्ये समाजवादी पक्षाला विजय मिळाला होता, पण 2014 मध्ये भाजपला तिथे 73 जागा मिळाल्या होत्या. ङ्घ 2018 मधील लोकसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणाचे निकाल जाहीर झाले. चारही राज्यांत भाजपचा पराभव झाला आणि तीनच महिन्यांनंतर निवडणुका होऊन भाजप विजयी झाला. तेलंगणात, जिथे भाजपचा एक आमदार आला, तेथून त्यांचे चार खासदार विजयी झाले. मी तुम्हाला गेल्या 15 वर्षांचा असा डेटा दाखवू शकतो.
त्याचा नैसर्गिक फायदा आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की, 2024 चा निर्णय झाला आहे. 2024 चा निर्णय 2024 मध्येच घेतला जाईल. त्यावेळी मी भाजपच्या विरुद्ध बाजूने उभा आहे हे पूर्णपणे स्पष्ट आहे. 2015 मध्ये बिहार, 2017 मध्ये पंजाब-यूपी, 2019 मध्ये आंध्र, 2021 मध्ये बंगाल-तामिळनाडूमध्ये काम केले, हे सर्व भाजपच्या विरोधात आहेत.
According to Prashant Kishor, 45 years of experience of Sangh Pracharak, Bjp activist and Chief Minister, that is why Prime Minister Narendra Modi is unique.
महत्त्वाच्या बातम्या
- पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न, संतप्त जमावाची आरोपी मौलानाला बेदम मारहाण, कपडे फाडून धिंडही काढली
- बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरने ७०० अमेरिकन नागरिकांची केली फसवणूक आठ जणांना अटक
- Modi – Patole : पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाना पटोलेंचा आक्षेपार्ह वक्तव्ये; कारवाईचे दिलीप वळसेंचे आश्वासन!!
- जेसीबी खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित