विशेष प्रतिनिधी
चंदीगड : आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभेत ११७ पैकी ९२ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. ‘आप’च्या विजयानंतर बंदी घालण्यात आलेली संघटना शीख फॉर जस्टिसने आरोप केला आहे की, खलिस्तान समर्थकांच्या मदतीने ‘आप’ ने पंजाब निवडणुकीत विजय मिळवला आहे. यासंदर्भात शिख फॉर जस्टिसने ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांना पत्र लिहिले आहे. ‘Aap’ wins in Punjab due to Khalistani funding Serious allegations of Sikhs for Justice
भगवंत मान यांना लिहिलेल्या पत्रात ‘आप’ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय ७० टक्के जागा जिंकल्याचे म्हटले आहे. ‘आप’ला खलिस्तानी समर्थकांकडून निधी मिळाला आणि खलिस्तानी समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळाला. ‘आप’ने शिख फॉर जस्टिसच्या बनावट पत्रांद्वारे मते मिळविली आणि पार्टीने खलिस्तान समर्थक शीखांच्या मतांचे फसवे समर्थन केल्याचे म्हटले आहे.
तसेच, शीख फॉर जस्टिसने आपल्या पत्रात आरोप केला आहे की, खलिस्तानी फंडिंगमुळे ‘आप’ने प्रचार केला नसतानाही त्यांना मते मिळाली. दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या ४८ तास अगोदर १८ फेब्रुवारी रोजी शीख फॉर जस्टिसने लेटर बॉम्ब फोडला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला होता.
बनावट पत्र व्हायरल झाल्यानंतर ‘आप’ नेते राघव चढ्ढा यांनी गुरपतवंत सिंग पन्नू यांना फोन केला होता. पन्नू यांच्या म्हणण्यानुसार, राघव चड्ढा यांनी त्यांना सांगितले की अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान खलिस्तानी रेफरेंडमचे समर्थन करतात.
यापूर्वी, शीख फॉर जस्टिसचे एक पत्र सोशल मीडियावर
व्हायरल होत होते, ज्यात दावा केला होता की शीख फॉर जस्टिसने पंजाबमध्ये आपला सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दिला आहे. यासोबतच भगवंत मान यांना ‘आप’चा मुखमंत्रीपदाचा चेहरा बनवण्यासाठी संघटनेनेही पाठिंबा दिल्याचा दावा या पत्रात केला जात होता, जो शीख फॉर जस्टिसने चुकीचा असल्याचे म्हटले होते.
‘Aap’ wins in Punjab due to Khalistani funding Serious allegations of Sikhs for Justice
महत्त्वाच्या बातम्या
- CONTROVERSIAL KCR : हिंदुस्तानातील एका राज्याच्या मुख्यमंत्री पदाला अशोभनीय वक्तव्य ! ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
- Maharashtra Budget 2022 : मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव; केसीआर – उद्धव ठाकरे भेटीचा परिणाम…??
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ – शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट- प्रत्येकानं बघावा असा सिनेमा- लपवलेला हिंदूंचा इतिहास-अनुपम खेर म्हणतात हा अभिनय नव्हे जिवंत इतिहास…
- Maharashtra Budget 2022 : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!