• Download App
    सरकारी खर्चाने आम आदमी पार्टीच्या जाहिराती; 163 कोटी वसूल करण्याचे आदेश; केजरीवालांना दणका Aam Aadmi Party advertisements at government expense; 163 crore ordered to be recovered; A blow to Kejriwal

    सरकारी खर्चाने आम आदमी पार्टीच्या जाहिराती; 163 कोटी वसूल करण्याचे आदेश; केजरीवालांना दणका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सरकारी योजनांच्या जाहिरातींच्या नावाखाली आम आदमी पार्टीने दिल्लीत पक्षाच्या जाहिराती छापल्या. त्याचे तब्बल 163.62 कोटी रुपये वसूल करण्याची नोटीस दिल्ली सरकारने आम आदमी पार्टीला पाठवली आहे. हे 163.62 कोटी रुपये जमा करण्यासाठी 10 दिवसांची मुदत सरकारने आम आदमी पार्टीला दिली आहे. या मुदतीत आम आदमी पार्टीने ही रक्कम भरली नाही, तर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. Aam Aadmi Party advertisements at government expense; 163 crore ordered to be recovered; A blow to Kejriwal



    दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचेच सरकार आहे. त्या सरकारने विविध सरकारी योजनांच्या नावाखाली स्वतःच्या पक्षाच्या जाहिराती सरकारी खर्चाने छापल्या. त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले आणि 97 कोटी रुपयांचे बिल वसूल करण्याचे आदेश दिले.

    त्यानुसार दिल्ली सरकारच्या प्रसिद्धी विभागाने या सर्व जाहिरातींचा हिशेब काढला आणि तो तब्बल 163.62 कोटी रुपये भरला आहे. त्यामुळे प्रसिद्धी विभागाने आम आदमी पार्टीला त्या रकमेची रिकव्हरी करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

    Aam Aadmi Party advertisements at government expense; 163 crore ordered to be recovered; A blow to Kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Om Birla : स्पीकर TMC च्या दोन्ही गटांची बाजू ऐकणार; ममता गटास बोलावले; बंडखोर MP च्या NCPI मध्ये जाण्यावर कायदेशीर मत घेणार

    Telegram Banned : 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी, नीट री-एक्झाममुळे निर्णय; मेसेज एडिट फीचर देखील 30 जूनपर्यंत बंद; 21 जून रोजी परीक्षा होईल

    Cough Syrup : सिरप आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळेल:सरकारने औषध खरेदीचे नियम बदलले; मध्य प्रदेशात दूषित सिरपमुळे 26 मुलांचा मृत्यू झाला होता