• Download App
    शिंदे - अजितदादा : घराणेशाही पक्ष चालविणाऱ्या नेत्यांनी सापत्न वागणूक दिलेल्या नेत्यांना मोदींच्या NDA बैठकीत मानाचे स्थान!! A place of honor in Modi's NDA meeting for leaders who have been mistreated by dynastic party leaders

    शिंदे – अजितदादा : घराणेशाही पक्ष चालविणाऱ्या नेत्यांनी सापत्न वागणूक दिलेल्या नेत्यांना मोदींच्या NDA बैठकीत मानाचे स्थान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 38 पक्षांच्या बोलावलेल्या NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचे स्थान दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही मानाचे स्थान मिळाल्याचे त्या बातम्यांमध्ये नमूद केले आहे. A place of honor in Modi’s NDA meeting for leaders who have been mistreated by dynastic party leaders

    पण त्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाची बाब मोदींच्या एनडीएच्या बैठकीत अधोरेखित होत आहे, ती म्हणजे घराणेशाही पक्ष संस्थापकांनी अथवा तो पक्ष चालविणाऱ्यांनी ज्या कर्तृत्व नेत्यांना सापत्न भावाची वर्तणूक दिली, त्या नेत्यांना पंतप्रधान मोदींनी NDA च्या बैठकीत मानाचे पान ठेवले आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी ही त्याची उदाहरणे आहेत. पलानीस्वामी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जतीन राम मांझी यांना देखील मोदींनी या बैठकीत मानाचे स्थान दिले आहे.

    अर्थात त्यामागे मोदींची राजकीय सोय आहे हे नाकारण्यात मतलब नाही. तरी देखील “नेहले पे देहला” या हिंदी कहावतीप्रमाणे मोदींनी 26 पक्षांच्या भूतपूर्व “यूपीए” आणि नव्या “इंडिया” या विरोधी आघाडीला आव्हान देताना पहिल्याच झटक्यात 38 पक्ष गोळा केले आणि त्यातही घराणेशाही पक्षांचे संस्थापक किंवा सध्या चालवणारे नेते त्यातून वगळून टाकले.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बैठकीत मानाचे स्थान दिले आहे. त्याचा गवगवा मराठी माध्यमे करत आहेत. पण त्यापलीकडे जाऊन मोदींनी या दोन्ही नेत्यांना मानाचे स्थान नेमकेपणाने का दिले??, याविषयी मात्र माध्यमांनी “सूचक मौन” बाळगले आहे.

    – ठाकरे – पवार बंगलोर मध्ये

    महाराष्ट्रातले घराणेशाही पक्षांचे संस्थापक आणि पक्ष चालवणारे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आजच बंगलोरात विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील झाले होते. त्यापैकी उद्धव ठाकरे कालपासून त्या बैठकीला हजर होते, तर शरद पवार आज त्या बैठकीला पोहोचले होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना निवेदन करण्याची संधी मिळाली. ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री नाहीत तर ते पुन्हा येतील, असा विश्वास व्यक्त केला.

    पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांना आपल्या शेजारी बसवून त्यांना मात्र निवेदनाची संधी दिली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 38 पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानाचे स्थान दिल्याच्या बातम्या ठळकपणे समोर आल्या आहेत.

    A place of honor in Modi’s NDA meeting for leaders who have been mistreated by dynastic party leaders

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित