• Download App
    दुसऱ्या दिवशी सोनिया गांधींची 6 तास ED चौकशी : आज पुन्हा बोलावले, काँग्रेसची देशभरात निदर्शने; राहुलसह अनेक खासदार स्थानबद्ध|6 hours ED interrogation of Sonia Gandhi next day called again today, Congress protests across the country; Many MPs along with Rahul are stationed

    दुसऱ्या दिवशी सोनिया गांधींची 6 तास ED चौकशी : आज पुन्हा बोलावले, काँग्रेसची देशभरात निदर्शने; राहुलसह अनेक खासदार स्थानबद्ध

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दुसऱ्या दिवशीही चौकशी केली. त्यांच्याशी सहा तासांहून जास्त वेळ प्रश्नोत्तरे झाली. त्यांना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.6 hours ED interrogation of Sonia Gandhi next day called again today, Congress protests across the country; Many MPs along with Rahul are stationed

    दुसरीकडे, काँग्रेसने केंद्र सरकारवर तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आरोप करत दिल्लीसह देशभरात निदर्शने केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह अनेक खासदारांना विजय चौकात ताब्यात घेतले. सोनिया गांधी सकाळी ११ वाजता ईडी मुख्यालयात पोहोचल्या. दुपारी ३.३० वाजता पुन्हा ईडीच्या कार्यालयात गेल्या. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी वढेरा आणि राहुल गांधी होते.



    राहुल काँग्रेस नेत्यांसोबतच्या आंदोलनात सहभागी झाले. प्रियंका ईडी कार्यालयातील दुसऱ्या खोलीत बसल्या होत्या.

    पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर राहुल म्हणाले की, सरकार महागाईच्या मुद्‌द्यावर संसदेत चर्चा होऊ देत नाही. निदर्शने केल्यावर अटक केली जात आहे. देशाला पोलिस स्टेट केले आहे. राहुल राष्ट्रपती भवनाकडे जात होते.

    6 hours ED interrogation of Sonia Gandhi next day called again today, Congress protests across the country; Many MPs along with Rahul are stationed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे