• Download App
    पंतप्रधान मोदींनी संसदेत स्थापित केलेल्या राजदंडाच्या 5 ऐतिहासिक रोचक बाबी|5 historical interesting aspects of the scepter installed by Prime Minister Modi in Parliament

    पंतप्रधान मोदींनी संसदेत स्थापित केलेल्या राजदंडाच्या 5 ऐतिहासिक रोचक बाबी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी अधिनाम संतांच्या उपस्थितीत ऐतिहासिक ‘सेंगोल’ स्थापित केले. एक दिवस आधी शनिवारी (27 मे) तामिळनाडूहून आलेल्या अधिनाम संतांनी हा ऐतिहासिक राजदंड पंतप्रधान मोदींना सुपूर्द केला. जाणून घेऊया या सेंगोलची खासियत.5 historical interesting aspects of the scepter installed by Prime Minister Modi in Parliament

    सेंगोलबद्दल 5 रंजक गोष्टी

    1. लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल स्थापित केले आहे. सेन्गोल हा शब्द तमिळ शब्द सेम्माईपासून आला आहे. याचा अर्थ – नैतिकता. आता सेंगोल हे देशाचे पवित्र राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जाईल.



    2. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, ब्रिटिश राजवटीतून भारतात हस्तांतरित झालेल्या सत्तेचे प्रतीक असलेले ऐतिहासिक ‘सेंगोल’ नवीन संसद भवनात स्थापित केले जाईल. ‘सेंगोल’ आतापर्यंत प्रयागराजमधील संग्रहालयात ठेवण्यात आले होते.

    3. तामिळनाडूचे चोल राज्य हे भारतातील एक प्राचीन राज्य होते. तेव्हा चोल सम्राट सेंगोलच्या सुपूर्द करून सत्ता हस्तांतरित करत असे. भगवान महादेवाचे आवाहन करत ते राजाकडे सुपूर्द करण्यात यायचे. राज गोपालाचारी यांनी नेहरूंना ही परंपरा सांगितली.

    4. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोल परंपरेनुसार सत्ता हस्तांतरणाचा मुद्दा मान्य केला आणि तो तामिळनाडूतून मागवण्यात आला. प्रथम हे सेंगोल लॉर्ड माउंटबॅटन यांना देण्यात आले आणि नंतर त्यांच्याकडून हस्तांतरण म्हणून ते नेहरूंच्या निवासस्थानी नेण्यात आले. जिथे गंगाजलाने सेंगोलचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर मंत्रोच्चारासह नेहरूंना सुपूर्द करण्यात आला.

    5. प्रयागराज संग्रहालयात हा सोन्याचा राजदंड पहिल्या मजल्यावरील नेहरू गॅलरीच्या प्रवेशद्वारावरील शोकेसमध्ये ठेवण्यात आला होता. या गॅलरीत पंडित नेहरूंच्या बालपणीच्या छायाचित्रांपासून ते त्यांच्या घरांच्या मॉडेल्सपर्यंत, आत्मचरित्र आणि भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूचनेनुसार, हे सेंगोल सुमारे 6 महिन्यांपूर्वी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रयागराज संग्रहालयातून दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात पाठवण्यात आले होते.

    5 historical interesting aspects of the scepter installed by Prime Minister Modi in Parliament

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार