• Download App
    मंत्र्यांनी एखादा फोन केला असता तरी विरोधक खुशीने संसदेच्या उद्घाटनाला गेले असते पण...; सुप्रिया सुळेंनी पाडले विरोधकांचे पितळ उघडे!!|NCP MP supriya sule exposed opposition boycott on the new parliament inauguration

    मंत्र्यांनी एखादा फोन केला असता तरी विरोधक खुशीने संसदेच्या उद्घाटनाला गेले असते पण…; सुप्रिया सुळेंनी पाडले विरोधकांचे पितळ उघडे!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आज 28 मे 2023 सावरकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नव्या भव्य दिव्य संसदेचे उद्घाटन केले. पण हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न होता ते मोदींच्या हस्ते झाले म्हणून उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्या सर्व विरोधी पक्षांचे पितळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उघडे पाडले.NCP MP supriya sule exposed opposition boycott on the new parliament inauguration

    एरवी एखादे महत्त्वाचे विधेयक संमत करायचे असल्यास सरकारमधले मंत्री विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन करतात. तसाच संसदेच्या उद्घाटन समारंभासाठी सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांनी एखादा फोन जरी केला असता तरी सर्व विरोधक उद्घाटन सोहळ्याला खुशीने गेले असते. पण कोणाही मंत्र्यांनी साधा फोनही केला नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखविली. संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. देश संविधानाने चालतो. लोकशाहीत विरोधी पक्षाला महत्त्व असते. डॉ. आंबेडकरांचाही तसाच आग्रह होता. आज संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात विरोधी पक्ष नाहीत. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा अपुरा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.



    पण सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्यातून विरोधकांच्या बहिष्काराचे पितळच उघडे पाडले. काँग्रेससह सर्व विरोधकांनी आदिवासी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यापेक्षा मोदींना स्वतःलाच मिरवायचे आहे. नामपट्टीकेवर स्वतःच्या नावापेक्षा दुसऱ्याचे नाव मोठे असू नये असे त्यांना वाटते, वगैरे टीका करून कार्यक्रमावर बहिष्कार घातला. पण सुप्रिया सुळे यांनी मात्र मंत्र्यांनी साधा फोनही केला नाही म्हणून विरोधक कार्यक्रमाला गेले नाहीत, असे उद्गार काढून सर्व विरोधकांचे पितळ उघडे पाडले.

    NCP MP supriya sule exposed opposition boycott on the new parliament inauguration

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bombay High Court : “मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?”:मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर