वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज एका अभ्यासात व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.‘सायन्स जर्नल’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या संशोधनामुळे खळबळ निर्माण झाली आहे. 31 lack people died due to corona in India
एका अभ्यासानुसार भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची वास्तविक संख्या ही नोंदविलेल्या आकड्यांच्या सहापट असू शकते. भारतात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार १७८ मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पण ‘सायन्स जर्नल’च्या अभ्यासानुसार देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा. गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान कोरोनामुळे अंदाजे ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.