• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक । 22 Year Old Delhi Youth detained after night-long search over PM Modi threat call

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक

    PM Modi threat call : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव सलमान आहे. काल रात्री त्याने पोलिसांना फोन करून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचे वय 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्याला खजुरी खास ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. 22 Year Old Delhi Youth detained after night-long search over PM Modi threat call


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव सलमान आहे. काल रात्री त्याने पोलिसांना फोन करून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचे वय 22 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्याला खजुरी खास ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

    सध्या सलमान पोलिस कोठडीत आहे आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत आणि तो सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. आरोपीच्या प्राथमिक चौकशीत त्याला पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा असल्याने त्याने धमकीचा फोन केल्याचे समोर आले आहे.

    दरम्यान, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची त्यानेही धमकी दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीला ताबडतोब अटक केली आणि चौकशी केली असता तो माणूस नशेत असल्याचे आढळले आणि त्याने दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

    22 Year Old Delhi Youth detained after night-long search over PM Modi threat call

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड