विशेष प्रतिनिधी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संघर्ष चालू आहे. त्याने हिंसक वळण घेतले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केला. अज्ञातांकडून दगडफेकही करण्यात आली.Violent clash between Shiv Sena and NCP, Eknath Khadse’s daughter Rohini’s vehicle was attacked
रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव इथं विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. रोहिणी खडसे या आपल्या फॉर्च्युनर गाडीने येत असताना अचानक काही जणांनी हल्ला केला. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर खडसे समर्थकांची घराजवळ गर्दी जमली होती.दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे.
रोहिणी खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली.
Violent clash between Shiv Sena and NCP, Eknath Khadse’s daughter Rohini’s vehicle was attacked
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदनगर मधील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 52 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण
- नागालँडमधून AFSPA हटवण्याबाबत समितीची स्थापना, मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची घोषणा
- ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या 100 स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली
- पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमी