विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी निवडणूक यामधील चार जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. दोन जागांची निवडणुक होत आहे. या साठी आज मतदान होत असून महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचे आव्हान आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचे आव्हान आहे. काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. Vidhan parishad election nagpur akola washim buldhana bjp congress shivsena
निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती. यामधील चार जागा बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे.
निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसने छोटू भोयर यांच्या जागी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने तसं पत्रक देखील काढलं आहे. छोटू भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती.
नागपुरातील पक्षीय बलाबल
- एकूण मतदार – ५५९
- भाजपा – ३१६
- काँग्रेस – १५०
- राष्ट्रवादी काँग्रेस – २४
- शिवसेना – २८
- बसप – १२
- शेकाप – ५
- स्थानिक गट – ७
- अपक्ष – १७
अकोला बुलडाणा वाशिममध्ये शिवसेना आणि भाजपा आमने-सामने
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढच पहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने निकाल काय असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अपक्ष मतदार आणि वंचित बहुजन आघाडी यावेळी महत्वाची भूमिका निभावू शकतात.
अकोला-बुलढाणा-वाशीम पक्षीय बलाबल
- एकूण मतदार – ८२२
- भाजपा – २४५
- काँग्रेस – १९१
- शिवसेना – १२४
- राष्ट्रवादी काँग्रेस – ९१
- वंचित – ८६
- एमआयएम – ७
- प्रहार – १
- अपक्ष, स्थानिक आघाडी – ७७
Vidhan parishad election nagpur akola washim buldhana bjp congress shivsena
महत्त्वाच्या बातम्या
- पांढर्या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी; उत्पादन कमी, दरवाढीने शेतकरी मालामाल
- आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी;कोरोना, ओमायक्रोन पार्श्वभूमीवर निर्णय
- पहिलीचे चार विषय आत एकाच पुस्तकमध्ये ; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं होणार कमी
- पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले