प्रतिनिधी
मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना मिळणार, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये अधून मधून पेरल्या जातात. या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मूळात यूपीएच्या अध्यक्षपदाची जागा खाली नाही, तर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष कसे होणार??, असा खोचक सवाल सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.UPA Sharad Pawar: How will Sharad Pawar become the President of UPA if the seat is not down ?; Sushilkumar Shinde’s sharp question
शरद पवार यांच्या संदर्भातील काही प्रश्नांना सुशीलकुमार यांनी उत्तर दिले आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदी सध्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. त्यामुळे यूपीएचे अध्यक्षपद मूळातच खाली नाही. अशा स्थितीत पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्याची कितीही आणि कोणीही मागणी केली तरी त्याला काही अर्थ नाही, अशा शब्दांमध्ये पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाची शक्यता सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळून लावली आहे.
उत्तर प्रदेश निवडणूक : काँग्रेसने 50 महिलांना तिकीटे दिली आणि सुशीलकुमार शिंदेंची सहज आठवण झाली!!
यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर उत्तर टाळले
शरद पवार मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचे आणखीन वेगळे चित्र दिसले असते, असे वक्तव्य काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत केले होते. याबाबत बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे वक्तव्य आहे, त्यांचे त्यांनाच विचारा, असे म्हणून थेट उत्तर देण्याचे टाळले.
ब्राह्मण आणि उच्चवर्णीय दंगली सुरू करतात, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर यांनी केले आहे. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सुशीलकुमार शिंदे यांनी कोणत्याही एका जातीला अशा पद्धतीने दोष देणे योग्य नाही. समाजात ब्राह्मण, मराठा, दलित सर्व जाती मिळून मिसळून राहतात. काही समाजकंटक दंगली पेटवत असतात. त्यामुळे एका जातीला दोष देणे चूक आहे, असे शिंदे म्हणाले.
केंद्राच्या राजकारणात शिंदे पुढे
सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांची राजकीय आणि वैयक्तिक मैत्री सर्वश्रुत आहे. तरी देखील शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. त्यांनी पवारांबरोबर राष्ट्रवादीत जाणे पसंत केले नाही. शरद पवार यांनीच त्यांना काँग्रेसच्या राजकारणात आणले तरी देखील काँग्रेसच्या एकूण राजकारणामुळे सुशीलकुमार शिंदे हे पवारांच्या पुढे निघून गेले. केंद्रात त्यांनी क्रमांक दोनचे गृहमंत्री पद भूषवले. एवढेच नाही तर लोकसभेत ते काँग्रेसचे नेते देखील झाले. पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे शिंदे यांची केंद्राच्या राजकारणात त्यांना बरोबरी करता आली नाही. केंद्राच्या राजकारणात पवारांना काँग्रेस एवढे यश मिळवता आले नाही.
या पार्श्वभूमीवर या राजकीय पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षपदी विराजमान असताना शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य केल्याने त्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.