महाराष्ट्रातले लसीकरण ४५ पुढच्या वयोगटाकडे वळविण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलेली नाही; केंद्र सरकारचा स्पष्ट खुलासाUnion Minister didn’t suggest’: Centre on Maharashtra selectively halting vaccination
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक लसींची कमतरता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यातले १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सावकाश करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला होता.
हा दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अशा प्रकारची कोणतीही सूचना महाराष्ट्राला केली नसल्याचा स्पष्ट खुलासा केंद्र सरकारने केला आहे.
१८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी स्वतः डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. केंद्र सरकारकडे लसी उपलब्ध नसल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे १८ ते ४५ वयोगटाच्या लसीकरणाचा वेग कमी करून उपलब्ध लसी ४५ पुढच्या वयोगटासाठी वापरण्याखेरीज पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे पडले.
महाराष्ट्राला परदेशातून लसी आयात करायच्या आहेत. पण तेथेही लसी उपलब्ध नाहीत, असा दावा राजेश टोपे यांनी केला होता. मात्र, हा दावा आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने पीआयबीने फेटाळून लावला आहे.
अशा प्रकारे कोणतीही सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली नसल्याचा स्पष्ट खुलासा करण्यात आला आहे.महाराष्ट्रात कोरोना ऍक्टीव्ह केसेसची संख्या घटनाता दिसत आहे. तरीही महाराष्ट्राला महिन्याला २ कोटी लसींची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे म्हणणे आहे.
Union Minister didn’t suggest’: Centre on Maharashtra selectively halting vaccination
महत्त्वाच्या बातम्या