• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांत १७ लाख कोटींचा अर्थसंकल्प दुप्पट, राष्ट्रीय कर परिषदेत डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन|Under the guidance of Prime Minister Narendra Modi, the budget of 17 lakh crore has been doubled in seven years. Statement by Bhagwat Karad

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांत १७ लाख कोटींचा अर्थसंकल्प दुप्पट, राष्ट्रीय कर परिषदेत डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सात वर्षांपूर्वी 17 लाख कोटींचा रुपयांचा असलेला भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपटीने वाढला आहे. प्रामाणिक करदात्यांमुळेच हे शक्य झाले. जीएसटीच्या संकलनातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा एकदा गतिमान झाल्याचे दिसत असल्याचे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी सांगितले.Under the guidance of Prime Minister Narendra Modi, the budget of 17 lakh crore has been doubled in seven years. Statement by Bhagwat Karad

    महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना (एमटीपीए), अखिल भारतीय कर व्यावयिक महासंघ (एआयएफटीपी), महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर व्यावसायिक संघटना (जीएसटीपीएएम) आणि उत्तर महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेमध्ये ते बोलत होते.



    कराड म्हणाले, अपेक्षित एक लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलनापेक्षा आता 1.30 लाख रुपयांचे जीएसटी संकलन होंताना दिसत आहे, यावरून आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत, हे दिसून येते.आर्थिक समावेशकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे.

    कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी कोविडपासून प्रतिबंधासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन करून कराड म्हणाले, या परिषदेत वस्तू आणि सेवा कर अंतर्गत अपील, प्राप्तिकराचे फेसलेस निर्धारण यांसारख्या अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अशी परिषद नियमितपणे आयोजित करणे ही एक स्वागतार्ह पद्धत आहे.

    चार वर्षांपूर्वी जेव्हा वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला तेव्हा त्याच्या रचनेत काही त्रुटी होत्या. पण हळूहळू कर व्यावसायिकांचे अभिप्राय आणि सूचनांमुळे या समस्या दूर केल्या जात आहेत. नवभारत आरोग्य, संपदा , पायाभूत सुविधा ह्यांनी परिपूर्ण असेल आणि वित्त या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. कर संकलनात पारदर्शकता आणणारी स्वच्छ आणि स्पष्ट व्यवस्था निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

    यावेळी सीए योगेश इंगळे लिखित ‘जीएसटी शास्त्र’, स्वप्नील शाह लिखित ‘जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर’ व सीए वैशाली खर्डे लिखित ‘अ प्रॅक्टिकल गाईड ऑन जीएसटी ऍक्ट’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन कराड यांच्या हस्ते झाले. क्रेडाईचे अध्यक्ष. सतीश मगर, एमटीपीएचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, एआयएफटीपीचे श्रीनिवास राव, एमटीपीएचे अध्यक्ष मनोज चितळीकर आदी उपस्थित होते.

    Under the guidance of Prime Minister Narendra Modi, the budget of 17 lakh crore has been doubled in seven years. Statement by Bhagwat Karad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!