• Download App
    उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावे; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा टोला!!|Uddhav Thackeray should be the Prime Minister; Tola of Shiv Sena to those who want to be the Chief Minister of NCP

    उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावे; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा टोला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी याच विधानाचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मलाही वाटतं उद्धव ठाकरे यांनी या देशाचं पंतप्रधान व्हावं, असा टोला शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी मुंडेंना लगावला आहे.Uddhav Thackeray should be the Prime Minister; Tola of Shiv Sena to those who want to be the Chief Minister of NCP



    सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. राज्यात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन पक्ष होईल तेव्हा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे विधान धनंजय मुंडे यांनी केले.

    पाटलांचा मुंडेंना टोला

    धनंजय मुंडे यांच्या या विधानावरुन शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. प्रत्येक पक्षाला असे वाटते की आपला पक्ष मोठा व्हावा. मलाही वाटते शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं, असे विधान करत पाटील यांनी मुंडेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

    Uddhav Thackeray should be the Prime Minister; Tola of Shiv Sena to those who want to be the Chief Minister of NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद? मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी; शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा