महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच म्हणजे उध्दव ठाकरे यांच्याकडे राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, अशी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये झाल्याची चर्चा आहे.Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच म्हणजे उध्दव ठाकरे यांच्याकडे राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, अशी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये झाल्याची चर्चा आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते तर सुरुवातीपासूनच, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित वर्तवत आहेत. आता, त्या दिशेनं एक पाऊल पुढे पडलं असून राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आरक्षण आणि राज्यातील अन्य काही प्रश्नांबाबत ही भेट होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हेही त्यांच्यासोबत होते.
पण, या भेटीपेक्षा, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात गेल्या पाच-सात दिवसांत ४० मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर भाजपाचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती मिळत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३० जागा लढवेल आणि शिवसेनेला १८ जागा दिल्या जातील, तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागांचं समसमान वाटप होईल. जो जास्त जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, इथपर्यंत या दोन नेत्यांचे बोलणं झाले आहे. भाजपाने शिवसेनेसमोर ठेवलेल्या प्रस्तावावर मातोश्रीमध्ये मंथन सुरू आहे.
पण काँग्रेस-राष्ट्रवादीलाही या फोन कॉलची माहिती आहे. भाजपाने शिवसेनेला या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कुठलीही ठरावीक कालमयार्दा दिलेली नाही. त्यामुळे ते आपला निर्णय काय घेणार, कधी घेणार आणि पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- मुकुल रॉय यांची आमदारकी धोक्यात, शुभेंदू अधिकारींचा विधानसभा अध्यक्षांना अर्ज, पक्षबदल कायद्यान्वये कारवाईची मागणी
- स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास रचला, इन्स्टाग्रामवर 300 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला सेलिब्रिटी
- भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची सडकून टीका
- जात प्रमाणपत्र हायकोर्टातून रद्द झाल्यानंतर नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयात धाव
- फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील 10 महापालिका, 20 नगर परिषदांच्या निवडणुकीची शक्यता