राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबियच आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखही अडचणीत आला आहे.Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबियच आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखही अडचणीत आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांनाही ईडीने (एऊ) अटक केली आहे.
ईडीच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले. त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला, जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानाच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.
एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा.
ईडीने न्यायालयात म्हटले, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांच्या थेट मालकीच्या ११ कंपनी आहेत. या कंपन्यांची आपआपसात पैशांची देवाणघेवाण होत होती. पैशांच्या व्यवहाराला काहीही ठोस कारण असल्याचे आढळून आले नाही. याचाच अर्थ हा पैसा हेरफार केला जात होता. यातील चार कंपन्यांचे संचालक असलेल्या विक्रम शर्मा यांनी अशी माहिती दिली की त्यांची कंपनी बनवण्यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी पैसे दिले होते. या कंपन्यांत मी संचालक होतो याची मला माहिती ही नव्हती.
अनिल देशमुख यांच्याकडून थेट आदेश मिळत होते. अनेक पोलीस चौकशीत देखील थेट आदेश मिळत होते. अनिल देशमुखांनी बार आणि रेस्टॉरंट मालकांची लिस्ट दिली होती. 4 कोटी 70 लाख रुपये डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात कुंदन शिंदे यांना दिले. नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. कुंदन शिंदे या संस्थेचा सदस्य आहे.
या संस्थेच्या बँक स्टेटमेंटचा अभ्यास केला असता गेल्या काही काळात 4 कोटी 18 लाख रुपये या संस्थेला दिल्लीच्या विविध कंपन्यांकडून मिळाले आहेत. चौकशीत समोर आलं की या कंपन्या फक्त पेपरवर आहेत आणि ट्रान्सफर एन्ट्री करण्याचे काम करतात.
Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांबाबत ईडीने केले धक्कादायक खुलासे, आणखी कोण-कोण आहेत रडारवर, वाचा सविस्तर…
- क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा, टी-२० विश्वचषक भारतात होण्याची शक्यता धुसर, जय शाह यांचे स्पष्टीकरण
- आंध्र प्रदेश राज्यसेवा आयोगाची मोठी घोषणा, सर्व परीक्षांसाठीच्या मुलाखती यापुढे बंद केल्याचा आदेश
- गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- पश्चिम बंगालमध्ये लवकरच लॉन्च होणार Student Credit Card, शिक्षणासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत लोन
ReplyReply allForward
|