• Download App
    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोनाची लागण । To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोनाची लागण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंत्री, आमदार आणि नेते मंडळींना चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. अनेकांना कोरोना झाल्याचे दिसून आले. आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कोरोना झाला आहे. To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection

    एकनाथ शिंदे यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे म्हंटले आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.



    महाराष्ट्रातील १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर नेतेमंडळी सर्वाधिक कोरोना बाधित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातून कोरोना संक्रमण जास्त पसरल्याचे स्पष्ट होत आहे.

    To Urban Development Minister Eknath Shinde Also corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Solapur : सोलापुरात धर्मांतरासाठी महिलांना पैशांचे आमिष; फादरवर गुन्हा दाखल

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच, त्यांनी काहीही सांगितले तरी आमच्यासाठी भूषणावह नाही!

    Chief Minister Fadnavis : क्रिएटर्स इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनण्याकडे महाराष्ट्र अग्रेसर, मुख्यमंत्र्यांची माहिती