वृत्तसंस्था
जालना : महाराष्ट्रात कोरोनाच्या AY 4 व्हेरीयंटचा शिरकाव झाला नाही. तो होऊ नये म्हणून आरोग्य विभागाला योग्य सूचना केल्या जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. There are no patients of Corona AY 4 variant in Maharashtra; Vaccination campaign to be implemented expeditiously: Tope
केंद्राच्या टास्क फोर्सने जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना केल्याची माहिती समोर आली आहे. मिशन कवचकुंडल अंतर्गत महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण केलं जाणार असल्याचे ते म्हणाले.
लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागाची मदत घेतली जात आहे. सध्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांचं आहे या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्राचा मानस नाही.त्यामुळे हे अंतर आहे तसेच कायम राहील, असेही ते म्हणाले.दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ३ दिवसांत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करून प्रयत्न केले जात असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.
There are no patients of Corona AY 4 variant in Maharashtra; Vaccination campaign to be implemented expeditiously: Tope
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच