विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी तो तयार केला आहे.
हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फूट आहे. पुतळ्यासाठी दीड टन धातूचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी सुप्रिया शिंदे यांना ८ महिने लागले. त्यासाठी त्यांनी त्या दररोज १० तास काम करत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. The statue of Sharad Pawar is created in Pune
खासदार सुप्रिया सुळे यांनी २७ सप्टेंबरला शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. तेथील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी शिल्पांचे फोटो ट्विट करत माहिती दिली. त्या ट्विटमध्ये म्हणतात, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील काम थक्क करणारे आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्पही त्यांनी साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे.
- शरद पवार यांचा पुतळा पुण्यात हुबेहूब साकारला
- पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फूट आहे
- पुतळ्यासाठी दररोज १० तास काम करत होत्या
- पुतळा बनविण्यासाठी लागले आठ महिने
- पवार यांचे फोटो आणि व्हिडिओंचा केला अभ्यास
- खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली वर्कशॉपला भेट
- शिल्पकलाकृती पाहून झाल्या आंचबित
- शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी साकारली अनेक शिल्प
- राजमाता जिजाऊ माँसाहेब, बालशिवाजी यांचे शिल्प
The statue of Sharad Pawar is created in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना असतानाही भारतीय लष्कराने सीमेवरील आव्हान परतवून लावले, जनरल मनोज नरवणे यांचे प्रतिपादन
- नवज्योत सिंग सिध्दू कुठूनही लढणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, कॅ. अमरिंदर सिंग यांचा इशारा
- बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिला हवाई दल अधिकाऱ्याची केली कौमार्य चाचणी, चेन्नई येथील प्रकार
- महामार्ग कसे अडवता म्हणत दिल्लील आंदोलक शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले