• Download App
    नवाब मलिक यांनी ज्याचे नाव घेतले त्या रियाज भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल!! ।The photo of Riaz Bhati with Sharad Pawar and Uddhav Thackeray, whose name was mentioned by Nawab Malik, went viral on social media !!

    नवाब मलिक यांनी ज्याचे नाव घेतले त्या रियाज भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल!!

    प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडताना राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी ज्या दाऊदच्या म्होरक्याचे म्हणजे रियाज भाटी याचे नाव घेतले होते, त्या रियाज भाटी याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बरोबरचे स्वतंत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

    त्यातही रियाज भाटी याच्या शरद पवारांबरोबरच्या फोटोचे वैशिष्ट्य असे की त्याने पवारांना नोटांची फ्रेम करून त्यांना भेट दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर “स्टेट एट होम” हा कोरोना काळातील त्याचा फोटो असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर त्याचा आदित्य ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. The photo of Riaz Bhati with Sharad Pawar and Uddhav Thackeray, whose name was mentioned by Nawab Malik, went viral on social media !!

    – मलिकांकडून समर्थन

    यासंदर्भात नवाब मलिक यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले होते की, रियाज भाटीचे फोटो कुणाबरोबर आहेत?, हे महत्त्वाचे नाही. सार्वजनिक जीवनात अनेक लोक येऊन आमच्यासारख्या नेत्यांबरोबर फोटो काढून नेतात. परंतु रियाज भाटी याच्यासारखा दाऊदचा माणूस थेट पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा काय जाऊ शकतो? त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही का?, असा सवाल त्यांनी केला होता.



    एक प्रकारे त्यांनी रियाज बाकीचे रियाज भाटी याचे नेत्यांबरोबरच्या फोटोंचे समर्थनच केलेले दिसून आले होते. आता त्याच रियाज भाटी याचे पवार आणि ठाकरे यांच्याबरोबर चे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकजण त्यावर विविध कमेंट करत आहेत.

    The photo of Riaz Bhati with Sharad Pawar and Uddhav Thackeray, whose name was mentioned by Nawab Malik, went viral on social media !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!