प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखणेऐवजी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश पोलिसांना देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहिंग्या घुसखोर व बांगलादेश घुसखोर यांचे महाराष्ट्रातले कारनामे विसरलेले दिसतात. कारण ते काँग्रेस सोबत आहेत ना…!!, अशा शब्दात भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.The Chief Minister, who keeps records of foreigners, forgot the deeds of Rohingyas and Bangladeshis when he went with the Congress; BJP’s Tikastra
मुंबईत साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात बाहेरच्या प्रांतांमधून कोणी तो त्याच्या नोंदी ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. राज्यात बाहेरून कोण येतो?
काय काम करतो, त्याच्या नोंदी ठेवा. त्यांच्यावर वचक ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावरच भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात परप्रांतीयांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना “केम छो वरली” म्हणते. “लाही चना” कार्यक्रम ठेवते आणि मुख्यमंत्री दुसरीकडे परप्रांतीयांची नोंद ठेवायला सांगतात. याचा निषेध व्हायला पाहिजे. त्यांच्याविरुद्ध आपण लवकरच 153 कलमाखाली पोलिसात तक्रार करणार आहोत असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
The Chief Minister, who keeps records of foreigners, forgot the deeds of Rohingyas and Bangladeshis when he went with the Congress; BJP’s Tikastra
महत्त्वाच्या बातम्या
- पुलवामामध्ये सीआरपीएफच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर ग्रेनेड हल्ला, हल्ल्यात 3 नागरिक जखमी
- उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथांनी सोडविले; मोदींनी वाजविला प्रचाराचा बिगुल
- असदुद्दीन ओवैसीना भारतातला नवा मोहम्मद अली जीना बनायचे आहे; भाजप आमदाराचा गंभीर आरोप
- प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा