• Download App
    सहानुभूती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पहिले पत्र ; हॉटेल-बार-परमीटरूम चालकांना सवलत देण्याची मागणी। Sympathy: Sharad Pawar's first letter to the Chief Minister; Demand for concessions to hotel-bar-perimeter drivers

    सहानुभूती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पहिले पत्र ; हॉटेल-बार-परमीटरूम चालकांना सवलत देण्याची मागणी

    शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे.


    या पत्रात त्यांनी हॉटेल परमीटरूम चालकांना सवलत देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली आहे. Sympathy: Sharad Pawar’s first letter to the Chief Minister; Demand for concessions to hotel-bar-perimeter drivers


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिक , बार-परमीटरूम आणि पर्यटन क्षेत्रावर आलेल्या संकटाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. हॉटेल व्यावसायिकांना वीज बिल तसेच मालमत्ता करात सवलत देऊन कोरोनाच्या संकटात त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.



    राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आजारपनातून बरे होताच पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.
    शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राविषयीची माहिती ट्विटरद्वारे दिली. या पत्रात शरद पवार म्हणतात, कोविड-19 या जागतिक महामारीच्या दुसऱया लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

    मागणी : एफएल-3 परवानाधारक हॉटेल-परमीट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान चार हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा देतील, असे शरद पवार यांनी पत्रात नमुद केले आहे.

    Sympathy : Sharad Pawar’s first letter to the Chief Minister; Demand for concessions to hotel-bar-perimeter drivers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी