• Download App
    सुप्रिया सुळेंची बारामती सीट धोक्यात, त्या कदाचित पवारांच्या राज्यसभेच्या सीटवर शिफ्ट होतील; पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित Supriya Sule's Baramati seat in jeopardy

    सुप्रिया सुळेंची बारामती सीट धोक्यात, त्या कदाचित पवारांच्या राज्यसभेच्या सीटवर शिफ्ट होतील; पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक सीट धोक्यात आली आहे, पण त्यातही खासदार सुप्रिया सुळे यांची बारामती सीट धोक्यात आली असून कदाचित त्या शरद पवारांच्या राज्यसभेच्या सीटवर शिफ्ट होतील, असे भाकीत माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. Supriya Sule’s Baramati seat in jeopardy

    लोकसत्ताच्या संवाद कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पासून भाजप शिवसेना काँग्रेस याविषयी परखड मते व्यक्त केली. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटी विषयी भाष्य केले अजित पवारांनी केलेले बंड राष्ट्रवादीसाठी कुठाराघात आहे. शरद पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करणे फार अवघड आहे. कारण प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देणे ही गोष्ट सोपी राहिलेली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


    राष्ट्रवादीतले अधोरेखित 4 : मुलीला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीतल्या इतरांना बाजूला सारले; पवारांच्या जखमेवर पृथ्वीराज चव्हाणांचे मलम की मीठ??


    त्याचवेळी त्यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात संदर्भात भाकीत केले. सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात सोपा उरलेला नाही. म्हणूनच कदाचित त्या शरद पवारांच्या जागी राज्यसभेवर शिफ्ट होतील, असे भाकित पृथ्वीराज चव्हाण यांनी केले, तर अजित दादा बारामती विधानसभा निवडणूक लढवतील मग शरद पवार त्यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण करतील, असेही ते म्हणाले.

    पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवारांनी केलेले बंड फसले. ते त्यावेळी तेवढे सिरीयस नव्हते. पण आत्ताचे बंड मात्र सिरीयस आहे. राष्ट्रवादीवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे, हे मान्य करावे लागेल, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

    पवार गट काँग्रेसमध्ये विलीन??

    शरद पवार यांच्यापुढे आपला राष्ट्रवादीतल्या गट काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय आहे का??, असे विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तशी शक्यता फार दूरची वाटते. पण विलीनीकरण करायचे ठरवले, तर बाकीच्या सगळ्या नेत्यांना काँग्रेसमध्ये सांगून घेता देखील येईल. पण खुद्द शरद पवारांना कुठे सामावून घ्यायचे??, हा प्रश्न निर्माण होईल. काँग्रेसमध्ये पार्लमेंटरी बोर्डाच्या निवडणुका झाल्या तर शरद पवारांना देखील पार्लमेंटरी बोर्डाचा सदस्य म्हणून सामावून घेता येईल. पण हा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर झाला पाहिजे, याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले.

    Supriya Sule’s Baramati seat in jeopardy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा