• Download App
    BJP state president Chandrashekhar Bawankule replied to Uddhav Thackerays criticism

    ‘’… तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही’’ चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल!

    ‘’…आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात.’’असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून  दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडल्यानंतर प्रथमच  उद्धव ठाकरे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिमला भेट देणार आहेत.  दरम्यान, यवतमाळमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा टीका केली. त्या टीकेला भाजपाकडूनही प्रत्त्युत्तर दिले गेले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule replied to Uddhav Thackerays criticism

    २०१९ साली अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला असता, तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते. तेव्हा अमित शाहांनी शब्द मोडला नसता तर आता भाजपा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री प्रत्येकी अडीच वर्षे राहिला असता, अशा आशयाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ‘’खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाहांसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती, तर नरेंद्र मोदी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही.’’

    याशिवाय ‘’युती करताना तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलं आणि निवडणुकीनंतर शरद पवारांनी हात पुढे केल्यावर भाजपासोबत गद्दारी केली. मतदान युती म्हणून मागितलं आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात.’’ असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

    याचबरोबर, ‘’शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही.’’ अशा शब्दांमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी टीका केली आहे.

    BJP state president Chandrashekhar Bawankule replied to Uddhav Thackerays criticism

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली