• Download App
    अजितदादांना निवृत्तीची कल्पना दिली होती; सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष पद अमान्य!!; पत्रकार परिषदेत पवारांची महत्त्वाची माहिती|Supriya sule rejected proposal of executive president, says sharad Pawar

    अजितदादांना निवृत्तीची कल्पना दिली होती; सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष पद अमान्य!!; पत्रकार परिषदेत पवारांची महत्त्वाची माहिती

    प्रतिनिधी

    मुंबई : आपण निवृत्ती घेणार असल्याची कल्पना अजित पवारांना दिली होती आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष पद मान्य नाही, अशी दोन महत्त्वाची विधाने शरद पवारांनी आजच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या पत्रकार परिषदेत केली आहेत. त्याकडे मराठी माध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे. मराठी माध्यमांनी सगळा फोकस पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला, याच बातम्यांवर ठेवला आहे. पण पवारांच्या पत्रकार परिषदेत वर उल्लेख केलेली दोन विधाने आणि अन्य एक मुद्दा हे सर्वात कळीचे मुद्दे होते.Supriya sule rejected proposal of executive president, says sharad Pawar

    आपण निवृत्ती संदर्भात काही निर्णय घेऊ शकतो, असे अजित पवारांना सांगितले होते. मात्र, या गोष्टीची कल्पना प्रफुल्ल पटेल अथवा जयंत पाटील आणि बाकीच्या नेत्यांना दिली नव्हती, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.



    त्याचवेळी उत्तराधिकाऱ्यासंदर्भात कोणता वेगळा प्रस्ताव आला आहे का??, कार्याध्यक्ष नेमण्याची काही चर्चा आहे का??, या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी असा प्रस्ताव आला होता. पण तो प्रस्ताव स्वतः सुप्रिया सुळे आणि बाकीच्या वरिष्ठ सहकार्यांना मान्य नव्हता, अशी माहिती दिली.

    त्याच वेळी पवारांनी जिल्हा पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत पदाधिकाऱ्यांना बढत्या देऊन पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा केली. पवारांच्या या घोषणेतच अजितदादांचे बंड रोखण्याची संघटनात्मक ताकद दडली आहे.

    स्वतः शरद पवार लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत जिल्हा पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत बदल घडविणार असतील आणि आपल्याला बळती मिळून पक्षात काम करण्याची संधी मिळणार असेल, तर अजितदादांबरोबर जाऊन आपला फायदा काय??, असा शंकेचा किडा पवारांनी या एका खेळीतून शेकडो पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात घातला आहे आणि यातच अजितदादांचे बंड थंडावण्याची ताकद दडली आहे.

    Supriya sule rejected proposal of executive president, says sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा