Monday, 5 May 2025
  • Download App
    ठाण्यात रहिवासी इमारतीच्या स्लॅब कोसळून 6 ठार, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण दबल्याची भीती । Six dead after Building Collapsed in Ulhasnagar Thane rescue operation underway News And Updates

    ठाण्यात रहिवासी इमारतीच्या स्लॅब कोसळून 6 ठार, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण दबल्याची भीती

    Six dead after Building Collapsed in Ulhasnagar Thane rescue operation underway News And Updates

    Building Collapsed in Ulhasnagar : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शुक्रवारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महिन्याभरात या भागातली ही दुसरी दुर्घटना आहे. Six dead after Building Collapsed in Ulhasnagar Thane rescue operation underway News And Updates


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शुक्रवारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महिन्याभरात या भागातली ही दुसरी दुर्घटना आहे.

    प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, नेहरू चौक परिसरातील साईसिद्धी इमारतीच्या 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

    दोन आठवड्यांपूर्वीही अशीच दुर्घटना

    15 मे रोजी उल्हासनगर टाउनशिपमध्ये बेकायदा इमारतीचा स्लॅब कोसळला होता. इमारत चार मजली होती आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब पडला. यानंतर दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबही कोसळत राहिले. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. बचाव पथकाने 11 जणांना बाहेर काढले होते.

    Six dead after Building Collapsed in Ulhasnagar Thane rescue operation underway News And Updates

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajnath Singh : राजनाथ सिंह अन् जपानच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये द्विपक्षीय बैठक

    रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, दहशतवादविरोधी लढ्यात पाठिंबा, पण शी जिनपिंग भेटीपूर्वी केले balancing act!!

    Bengal Governor : बंगालचे राज्यपाल म्हणाले- राज्यात कट्टरतावाद-अतिरेकीवाद मोठे आव्हान; राष्ट्रपती राजवटीचा पर्याय सुचवला