• Download App
    शिवसेनेत फूट : नारायण राणेंचे कन्फर्म ट्विट; शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय!!Shivsena splits : narayan rane confirms it

    शिवसेनेत फूट : नारायण राणेंचे कन्फर्म ट्विट; शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडली आहे. किंबहुना 35 आमदार फुटल्याची याचा अर्थ दोन तृतीयांश आमदार फुटल्याची बातमी आहे. याचा अर्थ शिवसेना एकसंध असून फक्त शरद पवारांशीच निष्ठावंत असलेलेच आमदाराचा शिवसेनेत उरले आहेत. स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्या बातमी कन्फर्म केली आहे. Shivsena splits : narayan rane confirms it

    “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता,” असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. या ट्विट मधूनच आता शिवसेनेतली फूट उघडपणे पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

    राजकीय भूकंप : शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत “नॉट रिचेबल” वाचा नावे!!

    महाराष्ट्रात राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ११ ते १२ आमदार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रातोरात नॉटरिचेबल आहेत. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

    – शिवसेनेचे ‘हे’ आमदार नॉट रिचेबल!!

    1. संजय गायकवाड – मेहकर
    2. संजय रायमुलकर – बुलढाणा
    3. महेश शिंदे – सातारा
    4. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
    5. प्रकाश अबिटकर – राधानगरी, कोल्हापूर
    6. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ
    7. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
    8. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
    9. अब्दुल सतार – सिल्लोड, औरंगाबाद
    10. संदिपान भूमरे – पैठण, औरंगाबाद
    11. संजय शिससाट – औरंगाबाद पश्चिम
    12. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद
    13. नितीन देशमुख – बाळापूर
    14. उदयसिंग राजपूत – कन्नड

    – एकनाथ शिंदेंसह 13 आमदार शिवसेनेवर नाराज

    असेही सांगितले जात आहे की, सोमवारी रात्री एकनाथ शिंदेंसह 13 आमदार सूरतच्या या हॉटेलमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी गुजरातच्या एका वरिष्ठ नेत्यासह गुप्त बैठकही केली. तसेच, या हॉटेल बाहेर सुरक्षा पोलीस तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह हे सर्व आमदार शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे ते नॉट रिचेबल होऊन थेट गुजरातला दाखल झाले आहे.  दरम्यान, या हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे.

    आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार की नाही

    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावले आहे. शिवसेनेतर्फे तातडीने मंगळवारी एक बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, विधान परिषद निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असून शिंदे यांच्यासह या सर्व आमदारांचे कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याने आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

    Shivsena splits : narayan rane confirms it

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा

    Ketan Agrawal : पुणे हत्याकांडात दावा- केतनचे डोके चिरडलेले होते; रेस्क्यू टीमचा सदस्य म्हणाला- लोक रडत होते, पण सिया शांत होती; आई-वडिलांची चौकशी