• Download App
    आता गोव्यातही महाविकास आघाडीच्या सत्तेची शिवसेनेला पडू लागली स्वप्ने, उत्तर प्रदेश व गोव्यात शिवसेना लढणार |Shiv sena will contest polls in UP and Goa

    आता गोव्यातही महाविकास आघाडीच्या सत्तेची शिवसेनेला पडू लागली स्वप्ने, उत्तर प्रदेश व गोव्यात शिवसेना लढणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – भाजपला रोखण्याच्या हेतून उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढविण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. उत्तर प्रदेशात शंभर; तर गोव्यात २० ते २१ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील. भाजपला रोखण्यासाठीच या निवडणुका लढणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.Shiv sena will contest polls in UP and Goa

    हिदुत्वाच्या मतांना नवा पर्याय देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहेय या आधीही शिवसेना या ठिकाणी लढली होती. मात्र त्यावेळी त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. यंदा मात्र महाराष्ट्रात सत्तेत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.



    याबाबत राऊत म्हणाले, “गोव्यात शिवसेनेने गेल्या पाच वर्षांपासून कामे केली आहेत. त्यामुळे या निवडणुकांत चांगले यश मिळेल अशा जागांचा विचार करून आम्ही उमेदवार देऊ.

    महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडीसारखाच प्रयोग होण्याची शक्यता असून, शिवसेनेला योग्य सन्मान मिळाला तर या आघाडीत सहभाग होऊ. उत्तर प्रदेशातही विविध ८० ते १०० मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार राहणार आहेत.”

    Shiv sena will contest polls in UP and Goa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल