• Download App
    महाविकास आघाडीत शिवसेनेचे 100% नुकसान; खासदार हेमंत पाटील यांचा घरचा आहेर; काँग्रेसला राष्ट्रवादीलाही टोला!! । Shiv sena MP Hemant Patil says, MVA is big loss for shiv sena!!

    महाविकास आघाडीत शिवसेनेचे 100% नुकसान; खासदार हेमंत पाटील यांचा घरचा आहेर; काँग्रेसला राष्ट्रवादीलाही टोला!!

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : महाराष्ट्रात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचेच 100 % नुकसान होत आहे. पण फक्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे आम्ही गप्प आहोत, अशा शेलक्या शब्दांत शिवसेनेचे नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्याच वेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील हाच टोला हाणला आहे. Shiv sena MP Hemant Patil says, MVA is big loss for shiv sena!!

    उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्ही मंत्री आहात, असा टोला त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांना लगावला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे म्हणून हे सरकार सत्तेवर आहे, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या मनातली खदखद खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांना बोलून दाखवली आहे. या राजकीय खदखदीला मोठी पार्श्वभूमी देखील आहे.

    शिवसेनेच्या अनेक आमदारांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आमदार निधी वाटपात शिवसेनेशी दुजाभाव करतात, असा आरोप केलाच आहे. गेल्या दोन वर्षात आमदार निधी वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना शिवसेनेच्या आमदारांनी पेक्षा चौपट निधी मिळाला आहे. शिवसेनेचे 56 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. काँग्रेसने देखील शिवसेनेला निधी वाटपात मागे टाकले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना एक नंबरचा पक्ष असून देखील निधी वाटपात मात्र मोठा फरक असून तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.



    या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटलांच्या विधानाकडे बघता येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार – खासदार गप्प आहेत असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. हा शिवसेनेला तर घरचा आहेर आहेच, पण त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही इशारा आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री आक्रमकपणे निधी ओढून घेतात हेच हेमंत पाटील यांना आपल्या वक्तव्यातून सूचित करायचे आहे. शिवसेनेची स्थानिक पातळीवर होणारी कोंडी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे. पण त्यांनी आदेश दिल्यामुळे आम्ही गप्पा आहोत या इशाऱ्यामध्येच शिवसेना भविष्यकाळात मुंबई मराठवाड्यासह अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर देखील आक्रमक होऊ शकते हा इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी देखील दडला आहे.

    Shiv sena MP Hemant Patil says, MVA is big loss for shiv sena!!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील