• Download App
    महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम| shiv sena MLA pratap sarnaik defends himself over letter to CM uddhav thackeray, but targets MVA leaders for not supporting him in ED case

    महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम

    प्रतिनिधी

    मुंबई : ED Case चा ससेमिरा टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे स्वतःच्या मुद्द्यावर आजही ठाम आहेत. आपल्यावरच्या संकटकाळात महाविकास आघाडीचे नेते पाठीशी उभे राहिले नाहीत, अशी खंत सरनाईकांनी विधिमंडळ परिसरात बोलून दाखविली आहे.  shiv sena MLA pratap sarnaik defends himself over letter to CM uddhav thackeray, but targets MVA leaders for not supporting him in ED case

    प्रताप सरनाईक म्हणाले, की “ED Case चा माझ्या कुटुंबावर घाला घातला जात असताना किंवा आरोप केले जात असताना माझ्या मनात एकच विचार येत होता की, आपण महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांना उत्तर दिली.



    पण महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. ते त्यांनी केले नाही म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. त्यात मी काही चूक केली असे वाटत नाही,” असेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

    ED Case मध्ये चौकशी आणि तपासापासून पळून जायला मी काही विजय मल्या, नीरव मोदी किंवा मेहूल चोक्सी नाही, अशी टिपण्णी देखील प्रताप सरनाईक यांनी केली. महाविकास आघाडीची स्थापना कंगना प्रकरण, अर्णव गोस्वामी प्रकरण यावेळी मी महाविकास आघाडीची बाजू आक्रमकपणे मांडली. मी प्रवक्ता होतो. ते माझे काम होते. पण म्हणूनच भाजपचा माझ्यावर राग होता, असा दावाही प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

    shiv sena MLA pratap sarnaik defends himself over letter to CM uddhav thackeray, but targets MVA leaders for not supporting him in ED case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस