विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या निवृत्ती नाट्यादरम्यान शरद पवारांनी आज प्रथमच यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर येऊन कार्यकर्त्यांची दोन मिनिटांचा संवाद साधला. पण त्यामध्ये बरीच मोठी “पॉलिटिकल हिंट” दिली. कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना दुर्लक्षित करणार नाही, असे आश्वासन त्यांनी देऊन आपणच 2024 च्या लोकसभा – विधानसभा निवडणुकी पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहू आणि बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेब ठाकरेंची कॉपी करू, असेच पवारांनी सूचित केले आणि ते पुन्हा यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये निघून गेले.Sharad Pawar may retain NCP presidentship, but copy balasaheb Thackeray’s formula of appointing supriya sule as executive president
2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत पवारांनीच अध्यक्ष राहावे आणि त्यांच्या मताप्रमाणे पक्षाची राजकीय व्यवस्था, कार्यकारिणी वगैरे लावावी, अशा भावना जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेत्यांनी परवा दिवशीच पवारांसमोर उघडपणे मांडल्या होत्या. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांबाबत चर्चा सुरू होतीच. त्यामध्ये स्वतः शरद पवार देखील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित राहून सहभागी झाले होते. मात्र, कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी धरणे धरून बसले होते. त्या आंदोलनकर्त्यांपुढे येऊन पवारांनी आपल्या भावाला दोन मिनिटांत व्यक्त केल्या. मी तुमच्याशी विचारविनिमय करून निवृत्तीचा निर्णय घ्यायला हवा होता. पण तुम्हाला विचारले असते, तर तुम्ही नाहीच म्हणाला असता. म्हणून मी माझ्या मनातला निर्णय घेतला. पण पुढचा निर्णय करताना तुमच्या मनातल्या भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. तुम्हाला दोन दिवसानंतर इथे बसावे लागणार नाही, याची मी खात्री देतो, एवढे बोलून पवार निघून गेले.
पवारांनी या दोन मिनिटांच्या संवादातच मोठी पॉलिटिकल हिंट देऊन टाकली 2024 लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहतील. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष किंवा पवारांच्या मनातले पद सांभाळतील आणि अजित पवारांची “विशिष्ट व्यवस्था” केली जाईल, अशा अशा स्वरूपाचा फॉर्म्युला असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हाच फॉर्मुला बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत वापरला होता. बाळासाहेब कधीच शिवसेनाप्रमुख पदावरून खाली उतरले नाहीत. पण उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद सोपविले आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख झाले नाहीत, तर ते शिवसेना पक्षप्रमुख झाले. याचा अर्थ कार्यकारी अधिकार उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे ठेवले.
पण यादरम्यानच्या काळात राज ठाकरे शिवसेनेबाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन कर्ते झाले आणि नारायण राणे यांच्यासारखे बाकीचे नेते शिवसेनेतून कायमचे बाहेर पडले. बाळासाहेबांच्या निर्णयाचा तो परिणाम होता.
पवार देखील आता कायमचे राष्ट्रवादीच्या “पितामह अध्यक्ष” राहून कार्यकारी अधिकार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा बाळासाहेबांचाच फॉर्म्युला आहे. त्यामुळे या फॉर्म्युलाची पवारांनी कॉपी केली की राष्ट्रवादीत त्याचे पडसाद कसे उमटतील?? त्याचे परिणाम पुढे काय होतील??, याची चर्चा मराठी माध्यमांमध्ये आधीच सुरू आहे. ती राष्ट्रवादीच्या फुटीची आहे आणि भाजप बरोबरच्या संधानाची आहे.
Sharad Pawar may retain NCP presidentship, but copy balasaheb Thackeray’s formula of appointing supriya sule as executive president
महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतरवर कुस्तीगीरांची पोलिसांशी बाचाबाची, बेड नेण्यावरून वाद, पहिलवानांचा आरोप– मद्यधुंद पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ केली
- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; AK47, पिस्तूलासह इतर दारूगोळा जप्त
- कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, झाडावर आढळले एक कोटी रुपये
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दहाव्यांदा वाढवले व्याजदर, 0.25 टक्के वाढ, 16 वर्षांतील सर्वोच्च