विशेष प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे कर्ताधर्ता शरद पवारांना उजनी धरणातले पाणी पळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी “घरचा आहेर” दिला आहे.sharad pawar is leader of maharashtra but he developed baramati only, allages shivsena MLA shahaji patil
उजनी धरणाचे पाणी इंदापूरला वळविण्याचे आदेश ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिल्यानंतर सोलापूर विरूध्द बारामतीकर हा राजकीय वाद पेटला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा विरोध वाढतो आहे.उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत करीत जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर हालगी नाद आंदोलन केले आहे.
सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. त्यावेळी आंदोलकांसमोर बोलताना शहाजी पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, की राज्यात ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे.
राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचे मॉडेल आहे हे देशभर सांगायचे ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते आहेत पण फक्त बारामतीचा विकास केला.”
उजनी धरणातून शरद पवारांनी बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेले. एवढे पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडत आहे असे वाटत आहे.
उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काही यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेले असते,” अशी टीकाही शहाजी पाटील यांनी केली आहे.
sharad pawar is leader of maharashtra but he developed baramati only, allages shivsena MLA shahaji patil
महत्त्वाच्या बातम्या
- WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ
- Free Import : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3 प्रकारच्या डाळी आयातीला परवानगी
- कोविशिल्डचा दुसरा डोस आता ८४ दिवसानंतर, को-विन पोर्टलमध्ये बदल; पूर्वीची अपॉईंटमेंट वैध
- Rajeev Satav : राजीव सातव यांच्यावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार
- पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा ; इस्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांची कोल्हेकुई