• Download App
    पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या सिंथेटिक ट्रॅकवर; क्रीडा व युवक संचालनालयाचा दिलगिरीचा खुलासा Sharad Pawar, former IOA president and other MVA ministers, in a brazen display of arrogance, run their cars on the tracks of Shivchhatrapati Sports Complex

    पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या सिंथेटिक ट्रॅकवर; क्रीडा व युवक संचालनालयाचा दिलगिरीचा खुलासा

    प्रतिनिधी

    पुणे – पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या बरोबरच्या मंत्र्यांच्या गाड्या चालविल्या गेल्या. या बद्दल राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खुलासा पाठविला आहे. Sharad Pawar, former IOA president and other MVA ministers, in a brazen display of arrogance, run their cars on the tracks of Shivchhatrapati Sports Complex

    बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमधल्या अॅथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या.

    त्यावरच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने पुणे जिल्हा माहिती कार्यालयाकडे खुलासा पाठवण्यात आला आहे. यात ते म्हणतात, की आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी वाहने क्रीडा संकुलातील ट्रॅकवर पाहणीसाठी आली होती. ऍथलेटिक्स ट्रॅक शेजारी असलेल्या सिमेंट क्रॉक्रिंटवरून प्रमुख मान्यवरांची एकच गाडी जाण्याचे नियोजन करण्यात आले होतं. मात्र काही गाड्या अचानक सिंथेटिक ट्रॅकवर गेल्याने दिलगिरी व्यक्त करत आहोत.

    असा खुलासा करणारे पत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. यापुढे अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर वाहने जाणार नाही याबाबत योग्य दखल घेतली जाईल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    Sharad Pawar, former IOA president and other MVA ministers, in a brazen display of arrogance, run their cars on the tracks of Shivchhatrapati Sports Complex

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस