• Download App
    ED ने समन्स न पाठवताही त्यांच्यासमोर हजर राहायला निघालेल्या शरद पवारांची ED ने प्रत्यक्ष कारवाई केल्यावर प्रतिक्रियाही का नाही...??|sharad pawar and supriya sule did not react to ED naming ajit pawar and sunetra pawar in suger factories scam

    ED ने समन्स न पाठवताही त्यांच्यासमोर हजर राहायला निघालेल्या शरद पवारांची ED ने प्रत्यक्ष कारवाई केल्यावर प्रतिक्रियाही का नाही…??

    नाशिक : राज्य शिखर बँक घोटाळ्यात नुसते नाव आले. ED ने समन्सही पाठविले नव्हते. तरीही २०१९ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी ED ला स्वतःहून सामोरे जायला निघालेले शरद पवार ED ने प्रत्यक्ष कारवाई सुरू केल्यानंतर प्रतिक्रियाही का व्यक्त करेनासे झालेत…?? हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडला आहे.sharad pawar and supriya sule did not react to ED naming ajit pawar and sunetra pawar in suger factories scam

    ED ने जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी गुरू कमॉडिटीजची ६५ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यात अजित पवार – सुनेत्रा पवारांचे नाव आले आहे. ED ने जारी केलेल्या ट्विटमध्ये आणि प्रेस नोटमध्ये या दोघांची नावे आहेत. तरीही शरद पवारांची प्रतिक्रिया आलेली नाही.



    याचिकाकर्ते शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव, अण्णा हजारे या तीन ज्येष्ठ व्यक्तींनी शरद पवारांचे थेट नाव घेतले आहे. माणिकराव जाधवांनी तर शरद पवारांना खुल्या वादाचे अर्थात जाहीर डिबेट करण्याचे आव्हान दिले आहे. तरीही शरद पवारांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

    माणिकराव जाधवांनी ५५ साखर कारखान्यांच्या बेकायदा विक्रीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ४५ कारखाने शिखर बँकेच्या ताब्यात आहेत. शरद पवार, अजित पवार त्यांचीही अशीच वासलात लावतील असा आरोप केला आहे. तरीही शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

    अण्णा हजारेंनी ४९ सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराची ED ने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पण वर उल्लेख केलेल्यांच्या प्रत्येक आरोपांना शरद पवार उत्तरे देत बसत नाहीत. ते आव्हानेही स्वीकारत नाहीत हे खरे आहे.

    वर नमूद केलेल्या संख्येने सध्या तरी नाहीत. जरंडेश्वर – गुरू कमॉडिटीजसारखेच ९ साखर कारखान्यांचे विक्री गैरव्यवहार ED च्या रडारवर आहेत. जरंडेश्वर – गुरू कमॉडिटीज नंतर त्यांचा नंबर लागणार असे बोलले जातेय.

    आणि यातून नवी कारवाई उद्भवू नये, म्हणून शरद पवारांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही का…?? की कारवाई अजित पवारांच्या नातेवाईकांवर म्हणजे मावसभाऊ राजेंद्र घाडगे यांच्यावर होते आहे हे भविष्यकालीन राजकारणाच्या दृष्टीने शरद पवारांना सोयीचे आहे म्हणून ते प्रतिक्रिया देत नाहीत…??

    एरवी अजित पवारांची पाठराखण करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील ED च्या प्रत्यक्ष कारवाईनंतर अद्याप प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. याचा राजकीय अर्थ वाचकांनी काय काढायचा…??

    sharad pawar and supriya sule did not react to ED naming ajit pawar and sunetra pawar in suger factories scam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा