• Download App
    बाळासाहेबांनी मणिशंकरला हाणली होती, तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का??; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल|Savarkar insult issue : Will you be able to show the courage to slap rahul Gandhi as balasaheb Thackeray slapped manishankar??, eknath shinde asks Uddhav Thackeray

    बाळासाहेबांनी मणिशंकरला हाणली होती, तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का??; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल

    प्रतिनिधी

    मुंबई : मालेगावमध्ये रविवारी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी ‘वीर सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधींना दिला होता. याच पार्श्वभूमीवरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगत, त्यांनी मणिशंकर अय्यरला थोबाडीत हाणली होती. तशी तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत आणण्याची हिंमत दाखवणार का असा बोचरा सवाल उद्धव ठाकरेंना केला.Savarkar insult issue : Will you be able to show the courage to slap rahul Gandhi as balasaheb Thackeray slapped manishankar??, eknath shinde asks Uddhav Thackeray



    सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘सहन करणार नाही, म्हणजे काय करणार नाही? हे तुम्ही त्यांना (उद्धव ठाकरे) विचारलं पाहिजे. वीर सावरकरांचा अपमान केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिंमत तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडात देऊन दाखवणार का?

    पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार? जेव्हा सगळ्या बाजूने भडिमार झाला, तेव्हा हे ‘उशीरा सुचलेले शहाणपण’ म्हणतो तसं हे बोललं गेलं. त्यामुळे बोलून काय होणार आहे? तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. तसंच त्यांचे चिरंजीव म्हणाले, हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. वेगवेगळ्या भूमिका आहेत. हे तुम्ही ठरवल्यासारखं करता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकतं नाही.’

    त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यरच्या पुतळ्या जोडे मारल्याचा फोटो पत्रकारांना दाखवून तुम्ही राहुल गांधींना असे जोडे मारण्याची हिंमत दाखवणार का??, असा सवाल उद्धव ठाकरेंना केला.

    Savarkar insult issue : Will you be able to show the courage to slap rahul Gandhi as balasaheb Thackeray slapped manishankar??, eknath shinde asks Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!