• Download App
    दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीला वरून संजय राऊत यांनी लगावला टोला | Sanjay Raut lashed out at the swearing in ceremony held two years ago early in the morning

    दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीला वरून संजय राऊत यांनी लगावला टोला

     विशेष प्रतिनिधी

    मुबंई : संजय राऊत यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील लवकरच सुटेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. कारण शरद पवार यांनी बरेच सकारात्मक मुद्दे बैठकीमध्ये मांडले आहेत, तसेच त्यांनी अनिल परब आणि अजित पवार यांच्याशी देखील अतिशय सकारात्मकदृष्टय़ा चर्चा केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

    Sanjay Raut lashed out at the swearing in ceremony held two years ago early in the morning

    नुकताच चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान केले होते की, गुढीपाडव्यापर्यंत राज्यात नवीन सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाणार. असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत 28 वेळा असे विधान केले आहे. आणि ते भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असल्याकारणाने त्यांना असे बोलणे भाग आहे. त्यांच्या बोलण्याने सरकार जात नाही, हे सर्वांना माहीत आहे. हे सरकार पुढचे 25 वर्ष टिकणार आहे. म्हणून सरकार पडेल असे चंद्रकांत पाटील म्हणत असतील तर त्यांना मी एवढेच सांगेन की, झोपेतून जागे व्हा.


    Sanjay Raut : शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत ; नेमकी चर्चा कशावर ?


    पुढे संजय राऊत हे म्हणतात की, पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होत आहेत. म्हणूनच बहुतेक चंद्रकांत पाटील यांना असे झटके येत असावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे आणि लवकरच ते कामावर रुजू होतील असे त्यांनी सांगितले आहे.

    Sanjay Raut lashed out at the swearing in ceremony held two years ago early in the morning

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!