नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ( Samrudhi Mahamarg ) येत्या सप्टेंबरपासून सर्वांकरिता खुला करण्याच्या हालचाली एमएसआरडीसीने सुरू केल्या आहेत. महामार्गाचे 76 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएसआरडीसीने केला आहे. लवकरच या महामार्गावरून प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. SamrudhiMahamarg: Nagpur-Mumbai Samrudhi Highway will be open to all in September
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ( Samrudhi Mahamarg ) येत्या सप्टेंबरपासून सर्वांकरिता खुला करण्याच्या हालचाली एमएसआरडीसीने सुरू केल्या आहेत. महामार्गाचे 76 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा एमएसआरडीसीने केला आहे. लवकरच या महामार्गावरून प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी (Balasaheb Thackeray samrudhi mahamarg ) महामार्ग बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग असून एकूण सहा मार्गिका आहेत. सुमारे 55 हजार कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे. दहा जिल्ह्यातून, 26 तालुके आणि 392 गावातून जाणारा हा महामार्ग असून 24 ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. या मार्गामुळे हे अंतर अवघ्या सात तासात पार करता येईल. व्यवसाय, उद्योग आणि व्यापाराला यामुळे चालना मिळणार आहे.
- मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन
सध्या या प्रकल्पाचे काम 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असा एमएसआरडीसीचा दावा आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या कामांचा आढावा घेत, प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान शिर्डी ते नागपूर टप्प्यातील बहुतांश काम अंतिम टप्प्यात आल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांना सांगितले. सप्टेंबरपर्यंत हा महामार्ग पूर्ण करून सर्वांकरिता खुला केला जाईल, तशी तयारी असल्याची ग्वाही एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अशी आहेत वैशिष्ट्ये
- हा महामार्ग दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, दी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, वर्धा व जालना येथील ड्राय पोर्टस् आणि मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या औद्योगिक क्षेत्रांना एकमेकांशी जोडणार आहे.
- महामार्गावर १७ गृहप्रकल्पही उभारले जाणार आहेत. त्यापैकी ९ प्रकल्प विदर्भात आहेत. एक नागपूरजवळ आहे.
- महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड राहणार आहेत. ते अंडरपासेसने जुळलेले राहतील.
- सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येकी पाच किलोमीटरवर मोफत टेलिफोन बूथ राहतील. ऑप्टिक फायबर केबल, गॅस पाइपलाइन, वीज लाइन इत्यादीसाठी विशेष जागा सोडली जाईल. महामार्गावर येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी २५ मार्ग राहतील.
SamrudhiMahamarg: Nagpur-Mumbai Samrudhi Highway will be open to all in September
महत्त्वाच्या बातम्या
- मला अटक केल्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अभिनेत्याची पोलीसांनाच धमकी
- नागरिकांच्या संतापानंतर राज्य सरकारचे एक पाऊल मागे, जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे
- महाविकास आघाडीच्या आरोग्य राज्य मंत्र्यांनीच मोडला जमावबंदीचा आदेश
- हिंदूंची घरे जळणार असतील तर मुसलमानांची घरे थोडीच सुरक्षित राहतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा