मुलाची अप्रतिम गोलंदाजी पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. त्याने मुलाच्या या अद्भुत कौशल्याचे कौतुक केले.Sachin discovers new diamond! Team India will get top cricketers like Rashid Khan
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सचिनने गुरुवारी (१४ ऑक्टोबर) एका मुलाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लहान मुलाच्या लेग स्पिनला पाहून सचिन खूप प्रभावित झाला आहे. सचिनने या व्हिडिओमध्ये दिसणारा लहान मुलगा कोण आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु एका मित्राने त्याला हा व्हिडिओ पाठवला आहे अस सचिन म्हणाला.
या व्हिडिओ मध्ये मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गोलंदाजी करत आहे. गोलंदाजी करताना तो मुलगा फलंदाजाला त्याच्या लेगब्रेक फिरकीने चकवताना दिसत आहे. हा मुलगा अनेक प्रकारचे चेंडू टाकत असल्याचे दिसत आहे आणि या प्रकारच्या गोलंदाजीत चांगलाच पारंगत असल्याचे दिसत आहे
मुलाची अप्रतिम गोलंदाजी पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. त्याने मुलाच्या या अद्भुत कौशल्याचे कौतुक केले. सचिनने ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, ‘ अरे व्वा. मित्राकडून हा व्हिडिओ मला मिळाला. या लहान मुलाचे खेळासाठी असलेले प्रेम आणि आवड ही अद्भुत आहे.’
सचिनने केलेल्या या पोस्टला आतापर्यंत ४४०० पेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आली आहे. इतकंच नाही तर ३४ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओ ला लाईक केले आहे. काहींनी तर अशी प्रतिक्रिया दिली आहे की , सचिनने राशिद खानसारखा प्रतिभाशाली फिरकीपटू सचिनने शोधला आहे.
Sachin discovers new diamond! Team India will get top cricketers like Rashid Khan
महत्त्वाच्या बातम्या
- विश्वचषक जिंकलेल्या दोन कर्णधारांमध्ये शीर्षक संघर्ष, धोनी किंवा मॉर्गन, कोणाची ट्रॉफी असेल?
- पंतप्रधान मोदींनी मिसाइल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन , म्हणाले – नेहमी लोकांसाठी प्रेरणा राहील
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन