पहिल्याच पावसाने मुंबईत दाणादाण उडाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. या तुंबलेल्या मुंबईवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कविता करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. पावसाच्या सरी येताच मुंबई भरली आहे, कुणाची जबाबदारी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.Rain showers, Mumbai flooded, Chief Minister sat at home, the people of Mumbai thought
प्रतिनिधी
मुंबई : पहिल्याच पावसाने मुंबईत दाणादाण उडाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. या तुंबलेल्या मुंबईवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कविता करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. पावसाच्या सरी येताच मुंबई भरली आहे, कुणाची जबाबदारी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पावसाच्या येता सरी, मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी अशी कविता भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट केलीआहे. मुंबई तुंबली असतांना मुख्यमंत्री त्यांच्या घरी बसले आहेत. त्यांना जनता विचारत आहे ही जबाबदारी कुणाची, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला.
मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी, चुनाभट्टी ते सायन आणि कुर्ला परिसरात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे वाहतूक १०:२० वाजेपासून, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक ११:१० वाजेपासून थांबवण्यात आली होती
. ठाणे ते कर्जत/कसारा आणि मानखुर्द ते पनवेल लोकल वाहतूक सुरू आहे. ट्रान्स हार्बर आणि बीएसयू (उरण) रेल्वे मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना कवितेतून सवाल विचारला आहे.
Rain showers, Mumbai flooded, Chief Minister sat at home, the people of Mumbai thought
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लसीकरणासाठी लोक कल्याण योजना, गोरगरीबांनाही घेता येणार खासगी रुग्णालयांत लस
- मार्गात संकटे ठाण मांडून बसतात तेव्हाच कृतिशील व्हा
- बालकांवरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्स, रेमडेसिव्हीरचा वापर करता येणार नाही
- सततच्या नकारात्मकतेमुळे आंबेडकरी समाजात कट्टरतावाद वाढण्याचा धोका