वृत्तसंस्था
पुणे : ‘गुगल पे’ द्वारे दंडाची रक्कम भरण्याची सुविधा पुणे पोलिस उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीला आळा बसणार आहे. Pune police Soon Will be cashless; The fine can be paid through Google Pay
वाहतूक नियमांचं किंवा संचारबंदीचं उल्लंघन केल्यास नागरिकांची पोलिस अडवणूक करतात. तसेच रोख रक्कम वसूल केली जाते. या लाचखोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आता कॅशलेस होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहेत.
पुणे शहरात 96 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. वाहनांची तपासणी केल्यानंतरचं त्यांना पुढे जाऊ दिलं जातं. या ठिकाणी पोलिस अडवणूक करतात. महत्त्वाचं काम असलं जाऊ देत नाहीत. नागरिकांना जबरदस्तीने 500 रुपयांची पावती करायला सांगतात.
पैसे नाहीत असं सांगितल्यास, पोलिस मित्राच्या अकाऊंटवर गुगल पे करायला सांगतात. यातून नागरिकांची मोठी लूट केली जाते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी अकारण अगदी छोट्या कारणांसाठी पावत्या फाडतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कॅशलेस होण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune police Soon Will be cashless; The fine can be paid through Google Pay
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक
- ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
- रामदेव बाबा यांचे अॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ; दिल्ली उच्च न्यायालय
- पाकिस्तानची मस्ती एका झटक्यात उतरविणाऱ्या व्यंकटेश प्रसादच्या मुखातून ऐका रामस्तुती
- पुण्यात हजारो दस्तांची बेकायदा नोंदणी; तीन वर्षांपासूनचा काळाबाजार उघड