• Download App
    राष्ट्रवादीकडून कोंडी झाल्याची शिवसैनिकांची घुसमट - खदखदच अनंत गीतेंच्या तोंडून बाहेर आलीय; प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर वार|praveen darekar targets shiv sena leadership over anant gite statement on sharad pawar

    राष्ट्रवादीकडून कोंडी झाल्याची शिवसैनिकांची घुसमट – खदखदच अनंत गीतेंच्या तोंडून बाहेर आलीय; प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर वार

    प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार स्थापन झाल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेला दाबून स्वतःच्या पक्षाचा विस्तार करतेय आणि शिवसेनेला टार्गेट करतीय त्या सगळ्या गोष्टींची घुसमट, वेदना, संवेदना, भावना अनंत गीते यांच्या वक्तव्यामधून आज बाहेर आल्यात, असा टोला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेतृत्वाला लगावला आहे.praveen darekar targets shiv sena leadership over anant gite statement on sharad pawar

    माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भूमिका बरोबर आहे, की संजय राऊत यांची भूमिका योग्य आहे हे शिवसेनेने स्पष्ट करावे, असे आव्हानही प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेतृत्वाला आज पत्रकार परिषदेत दिले आहे.



    प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अनैसर्गिक युती केली, ती तडजोड आहे याची पोलखोलच अनंत गीते यांनी करून टाकली आहे.

    आज शिवसैनिकांचे तालुकास्तरावर जे खच्चीकरण होतेय, शिवसेनेचे आमदार ज्या विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून निधी देण्यात जो दूजाभाव आहे.

    शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही राज्य – जिल्हा समितींच्या नेमणुकांमध्ये वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. या सगळ्यांचा परिपाक म्हणूनच अनंत गीतेंच्या मुखातून, “शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत,” हे विधान आले आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

    praveen darekar targets shiv sena leadership over anant gite statement on sharad pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Solapur : सोलापुरात धर्मांतरासाठी महिलांना पैशांचे आमिष; फादरवर गुन्हा दाखल

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच, त्यांनी काहीही सांगितले तरी आमच्यासाठी भूषणावह नाही!

    Chief Minister Fadnavis : क्रिएटर्स इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनण्याकडे महाराष्ट्र अग्रेसर, मुख्यमंत्र्यांची माहिती