• Download App
    पंढरपुरचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला; भारतात सुखरूप आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न । Pandharpur student stranded in Ukraine; Efforts at senior level to bring to India

    पंढरपुरचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला; भारतात सुखरूप आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपुर : रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये, विशेषत: रशिया युक्रेन सीमेनजीक तब्बल २० हजार भारतीय विद्यार्थी वा नागरिक वास्तव्यास आहेत.युक्रेनमधल्या वैद्यकीय महाविद्यालयांत अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पंढरपूर येथील प्रसाद शिंदे-नाईक हा मुलगा बुकवेनिक स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला होता. परंतु रशियाने युक्रेनच्या राजधानीच्या विमानतळावर हल्ला केल्याने विमानसेवा रद्द झाली असल्याने तो तेथे अडकला आहे. Pandharpur student stranded in Ukraine; Efforts at senior level to bring to India



    मुलांना युनिव्हर्सिटीकडे परत बोलावण्यात आले आहे. या पथकाबरोबर भारतातील ८० विद्यार्थी असून त्यामध्ये महाराष्ट्रातील १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान भाऊसाहेब शिंदे-नाईक यांनी मुलगा प्रसाद याच्याशी गुरुवारी रात्री भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. त्याने मी सुखरुप आहे. आम्ही पुन्हा विद्यापीठाकडे चाललो आहोत, दोन दिवसात परिस्थिती निवळल्यानंतर आम्ही भारतात परत येऊ, असे प्रसाद याने सांगितले. शिंदे यांनी आमदर समाधान आवताडे यांच्याशी संपर्क साधला आहे.नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचेही भारताने नमूद केले आहे. आवश्यकता भासल्यास सर्व भारतीयांना भारतात परत घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय सरकारने नागरिकांना तात्पुरता देश सोडावा लागणार, असा सल्ला युक्रेनमधल्या भारतीयांना गेल्या काही दिवसांमध्ये दिला होता.

    Pandharpur student stranded in Ukraine; Efforts at senior level to bring to India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक