• Download App
    पंढरपूर : आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचा प्रयत्न ; भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीPandharpur: Attempt to assassinate Acharya Tushar Bhosale; BJP and NCP workers clash

    पंढरपूर : आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचा प्रयत्न ; भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचाही प्रयत्न केला.Pandharpur: Attempt to assassinate Acharya Tushar Bhosale; BJP and NCP workers clash


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : आचार्य तुषार भोसले यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवार यांच्यावर वक्तव्य केले होते. त्यानंतर आज नव वर्षानिमित्त आचार्य तुषार भोसले पंढरपूरमध्ये श्री. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यास आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काही कार्यकर्ते हातात अबिर बुक्का घेऊन मंदिरा जवळ आले होते.



    तुषार भोसले बाहेर येत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले.यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातच दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

    याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचाही प्रयत्न केला. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याने हा प्रकार टळला गेला. यानंतर परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    Pandharpur: Attempt to assassinate Acharya Tushar Bhosale; BJP and NCP workers clash

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस