• Download App
    "आजोबा" राज ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी छगन भुजबळ पुत्र पंकज पत्नीसह शिवतीर्थावर!!On Shivatirtha with Chhagan Bhujbal's son Pankaj's wife to congratulate Raj Thackeray

    “आजोबा” राज ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी छगन भुजबळ पुत्र पंकज पत्नीसह शिवतीर्थावर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांबरोबर छगन भुजबळांचा देखील कडक भाषेत समाचार घेतला. त्याला एक दिवस उलटला नाही, तोच छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे “आजोबा” राज ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवतीर्थावर जाऊन पोहोचले.On Shivatirtha with Chhagan Bhujbal’s son Pankaj’s wife to congratulate Raj Thackeray

    राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांचा काल जोरदार समाचार घेतला होता. छगन भुजबळ यांनी त्यांच्या संस्थेत गैरव्यवहार केला. त्यांच्या पीए मुळे आणि त्यांच्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी मुळेच भुजबळांना तुरुंगवास घडला. पण तुरुंगातून बाहेर आलेल्या बरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यांना मंत्रिपदाची संधी दिली, असे शरसंधान राज ठाकरे यांनी साधले होते.



    आज पंकज भुजबळ हे पत्नीसह राज ठाकरे यांना भेटायला शिवतीर्थावर गेले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज ठाकरे हे आजोबा झाले आहेत. त्यांना नातू झाल्याने त्यांच्या सदिच्छा भेटीला गेलो होतो, असे स्पष्टीकरण पंकज भुजबळ यांनी दिले आहे.

    भुजबळ – शिवसेना संघर्ष

    छगन भुजबळ आहे आज जरी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात असले तरी त्यांचा नाशिक जिल्ह्यातला संघर्ष हा प्रामुख्याने शिवसेनेशीच आहे.

    पंकज भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. पार्श्‍वभूमीवर पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचा कट्टर विरोध असणाऱ्या राज ठाकरे यांची भेट घेणे याला विशेष महत्त्व असल्याचे मानले जात आहे.

    On Shivatirtha with Chhagan Bhujbal’s son Pankaj’s wife to congratulate Raj Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस