विशेष प्रतिनिधी
चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जो राजकीय तणाव निर्माण झालाय, त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू असून त्यांचे चिपळूणात भव्य स्वागतही करण्यात आले. Narayan Rane`s Jan Ashirwad Yatra reached in chiplun amid political tension between Shiv Sena and BJP
नारायण राणे यांनी तत्परतेने एका पाठोपाठ एक ट्विट करून चिपळूणमधील कार्यक्रमांची माहिती आणि फोटो शेअर केलेत. जन आशीर्वाद यात्रेच्या पाचव्या दिवशी चिपळूणच्या बहादूरशेख नाका येथे नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, खेर्डी ग्रामपंचायत तसेच मुस्लिम समाजातर्फे स्वागत करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून मानवंदना दिली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच चिपळूणमध्ये महाराष्ट्राच्या संकट काळात ज्या योध्यांनी खंबीर उभे राहून देवदूतासारखी मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करत सत्कार केले, तसेच पेढे परशुराम ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमधून दिली.
गुन्हाच केलेला नाही, ठाकरे सरकारला आव्हान
-माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्य सरकारने सुडाचे राजकारण करू नये, असा इशारा नारायण राणे यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमधून दिला.
Narayan Rane`s Jan Ashirwad Yatra reached in chiplun amid political tension between Shiv Sena and BJP
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणे यांनी केली संपूर्ण रेल्वेच बुक, कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस
- लष्करात महिलांचे पाऊल पडते पुढे, पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना प्रौढांइतकाच धोका असेल, तज्ञांनी प्रतिबंधासाठी या सूचना दिल्या
- मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप