• Download App
    Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains: orange alert

    Orange Alert Mumbai rains: मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी : पुढील तीन दिवस पावसाचे ; ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

    गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains: orange alert


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पावसामुळे कुठेही पाणी साचल्याच्या किंवा वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या नसल्याचं वृत्त आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains: orange alert



    मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, आतापर्यंत या भागात कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता कमी झाली आहे. येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे.

    Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains: orange alert

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस