• Download App
    तालिबानला पाकिस्तानचीच फूस असल्याचा अफगाण पॉप स्टार आर्यानाचा आरोप |Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan's puppet

    तालिबानला पाकिस्तानचीच फूस असल्याचा अफगाण पॉप स्टार आर्यानाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – तालिबानला पाकिस्तानची फूस असल्याचा आरोप करताना अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉप स्टार आर्याना सयीद हिने भारत हा सच्चा मित्र असल्याची भावना व्यक्त केली आहे.
    तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काबूलमधून निसटण्यात आर्याना यशस्वी ठरली.Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet

    तिने एका अज्ञात ठिकाणावरून ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. पाकला धारेवर धरताना ती म्हणाली की, तालिबानी दहशतवाद्यांना पाककडून सूचना आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे तळ पाकिस्तानात आहेत.



    आर्यानाने जगाला आवाहनही केले. ती म्हणाली की, आंतरराष्ट्रीय समुदाय सर्वप्रथम पाकचा निधी रोखेल अशी मला आशा आहे. तालिबानला पैसा पुरविण्यासाठी पाकला निधी देऊ करू नये. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र बसून अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तोडगा शोधावा.

    त्यांनी पाकवर दबाव आणावा. अफगाणिस्तानमधील या सर्व समस्यांचा त्यांना पाकमुळेच सामना करावा लागत असल्याचे माझे ठाम मत आहे.

    Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते