• Download App
    मुंबई : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा ; शिवसेनेने महापालिकेकडे केली मागणी । Mumbai: Raise a permanent umbrella over the heads of statues of great men; Shiv Sena made a demand to the Municipal Corporation

    मुंबई : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा ; शिवसेनेने महापालिकेकडे केली मागणी

    विशेष म्हणजे देशासाठी योगदान देणाऱ्या या महापुरुषांबद्दल समाजातील प्रत्येकामध्ये आदर, प्रेमभावना आहे. Mumbai: Raise a permanent umbrella over the heads of statues of great men; Shiv Sena made a demand to the Municipal Corporation


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशासाठी, समाजासाठी योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांचे पुतळे मुंबईत आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांचा समावेश आहे.दरम्यान या महापुरुषांच्या पुतळ्यांचे ऊन-वारा-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सर्व पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे केली आहे.



    यातील काही पुतळे आणि पुतळ्यांच्या आजूबाजूचा परिसर हा अस्वच्छ असतो.त्यामुळे आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नेमावेत, अशी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महापालिकेच्या महासभेत केली आहे.विशेष म्हणजे देशासाठी योगदान देणाऱ्या या महापुरुषांबद्दल समाजातील प्रत्येकामध्ये आदर, प्रेमभावना आहे. काही पुतळे हे काही संस्थांनी तर काही राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आले आहेत.

    Mumbai: Raise a permanent umbrella over the heads of statues of great men; Shiv Sena made a demand to the Municipal Corporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!