प्रतिनिधी
मुंबई : बीएमसीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.13) रणशिंग फुंकले. ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या मनपा निवडणुकीची सूत्रे पवारांनी हाती घेतली आहेत. पवार स्वत: मुंबईत फिरणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिल्या आहेत.Mumbai municipal elections: Sharad Pawar entered the fray, NCP workers were put to work
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मुंबई महापालिकेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. पवार म्हणाले,मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेते वेळ देतीलच, मी देखील वेळ देईन.
पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे, असे पवार म्हणाले.
२०१९ मध्ये केवळ ८ नगरसेवक आले निवडून
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २२७ नगरसेवकांच्या मुंबई पालिकेत राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक होते. त्यातच राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी मुंबई पालिका निवडणुकीत काय आव्हान उभे करणार, असा प्रश्न आहे.
Mumbai municipal elections: Sharad Pawar entered the fray, NCP workers were put to work
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रपतीपद ते मुंबई महापालिका निवडणूक ; शरद पवारांचे टॉक नॅशनली, ॲक्ट लोकली!!
- पाणी – पथदिवे योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होणार, थकित बिले सरकार टप्प्याटप्प्याने भरणार
- MPSC : नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 14 जुलै शेवटचा दिवस शिल्लक!!
- हमीद अन्सारींचे प्रत्युत्तर : नुसरत मिर्झाला ना मी बोलवले, ना मी त्यांच्याशी बोललो; भाजपकडून चुकीचे आरोप!!